डाॅ. डि. वाय पाटील ट्रस्ट मार्फत पूरग्रस्तांना आर्थिक मदत - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2019

डाॅ. डि. वाय पाटील ट्रस्ट मार्फत पूरग्रस्तांना आर्थिक मदत


चंदगड / प्रतिनिधी
सतेज ऊर्फ बंटी पाटील  यांचा अलीकडे  पुुुरपरीस्थिती पाहणी दौरा  झाला होता. त्यावेळी गडहिंग्लज नदीवेस भागाची  पाहणी करत आसताना  पुर्ण पडलेल्या घरांना ५००० पाच हजार रुपये  व अंशत: पडलेल्या घराला ३००० तीन हजार रुपये मदत देेेवु असे घोषित केले होते. त्याप्रमाणे गडहिंग्लजमध्ये  वाटप करण्यात आले. बंटी पाटील यांचे विश्वासू कट्टर समर्थक गडहिंग्लज पंचायत समिती उपसभापती विद्याधर गुरबॆ यांच्या हस्ते करण्यात आले. या  कार्यकमास  शिवराज शिक्षण समुहाचे अध्यक्ष किसनराव कुराडे, गडहिंग्लज कॉंग्रेसचे  अध्यक्ष  बी. एन. पाटील व गडहिग्लज कॉंग्रेस शहर अध्यक्ष बवराज आजरी, ॲड. दिग्वीजय कुराडे, सागर हिरेमठ. हिरा शुगरचे संचालक. समगोंडा आरबोळे,  नगरसेवक हारुण सय्यद इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment