जिल्हास्तरीय युवा महोत्सवात कोवाड महाविद्यालयाचे यश - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2019

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात कोवाड महाविद्यालयाचे यश

जयसिंगपूर येथील युवा महोत्सवात कला सादर करताना कोवाड महाविद्यालयाचा विद्यार्थी जोतिबा गुरव
कोवाड / प्रतिनिधी 
शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर यांच्यावतीने जयसिंगपूर येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने उज्वल यश संपादन केले. या महाविद्यालयाच्या बी. ए. भाग तीन मध्ये शिकणारा जोतिबा कृष्णा गुरव याने `नकला` अभिनय प्रकारात संपूर्ण महाविद्यालयामध्ये दुसरा क्रमांक मिळवला. याची फलटण येथे होणाऱ्या मध्यवर्ती युवा महोत्सवासाठी निवड झाली आहे. याबरोबरच महाविद्यालयातील कलाकारांनी पाच कला प्रकारात सहभाग घेतला होता . यामध्ये हरियाली लोकनृत्य, समुहगान, सुगम गायन, भाषण, नक्कल यांचा समावेश होता. या सर्वांना महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. विठ्ठल दळवी, प्रा. डॉ. आर. डी. कांबळे, प्रा. एम. एस. घोळसे, प्राचार्य डॉ. एस. एम. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment