जयसिंग पाटील |
अनुदानावर ट्रँक्टर मिळवून देतो असे सांगून तीन लाख ऐंशी हजार रुपये दिल्यानंतरही ट्रॅक्टर मिळत नाही हे समजल्याने आपली फसवणूक झाल्याच्या नैराशेतून विष प्राशन केलेल्या जयसिंग प्रभाकर पाटील (वय 23), रा. डोणेवाडी (ता. गडहिंग्लज) या तरुणाचा बेळगाव येथील दवाखान्यात उपचार सुरू असताना शनिवारी दुर्दैवीरित्या म्रुत्यु झाला. फसवणूक करणारा विठ्ठल भरमु पेडणेकर (रा. पार्ले ता. चंदगड) यांच्या विरोधात सौ. पद्मावती प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदगड पोलिसांनी गुन्हा नोंंदवला आहे.
डोणेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील जयसिंग प्रभाकर पाटील या तरुणाला अनुदानावर ट्रँक्टर मिळवून देतो असे सांगुन वेळोवेळी तीन लाख अऐंशी हजार रुपये पेडणेकर याने उखळले. एवढे पैसे देऊनही आपल्याला ट्रँक्टर मिळत नाही याची खात्री झाल्यावर जयसिंग ने आपल्याला पैसे परत करण्यची मागणी पेडणेकर याच्याकडे केली. पण पेडणेकर हा बतावणी करून वेळ मारुन नेवू लागला .काही दिवसानंतर विठ्ठल पेडणेकर याने जयसिग ला एक लाख पंच्चावन हजार रुपये दिले मात्र त्यानंतर तो उडवा-उडवीची उत्तर देवु लागला. नंतर भेटही बंद झाली त्यामुळे आपण पूर्णतः फसवले गेलो या विवंचनेत जयशिंगने काल शुक्रवारी विष प्राशन केले. अत्यावस्थेत त्याला उपचारासाठी बेळगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यावर उपचार सुरू होते. मात्र शनिवारी दुपारी त्याचा उपचारादरम्यान म्रुत्यु झाला. या घटनेची नोंद चंदगड पोलिसांत झाली आहे. . पोलिस निरीक्षक अशोक सातपूते करत आहेत.अनुदानावर ट्रॅक्टर व इतर साहित्य देतो व नोकरी लावतो असे सांगून अनेक युवकांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे.पोलिस तपासात हा प्रकार उघडकीस येणार आहे.
No comments:
Post a Comment