सरस्वती विद्यालय कालकुंद्री 'येथे आता कचरा नाही' शिक्षक प्रशिक्षण संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

22 September 2019

सरस्वती विद्यालय कालकुंद्री 'येथे आता कचरा नाही' शिक्षक प्रशिक्षण संपन्न

संघटना समन्वय समितीकडून डस्टबिनची मागणी
कालकुंद्री येथे 'आता कचरा नाही' प्रशिक्षण प्रसंगी कचरा कुंड्यांची मागणी करताना  गोविंद पाटील सोबत वाय. आर निटूरकर, श्रीकांत पाटील, डी.आय. पाटिल, भैरू भोगण व मान्यवर.
कालकुंद्री (प्रतिनिधी) 
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड व कोल्हापूर जि प च्या वतीने आता कचरा नाही (वेस्ट नो मोअर) हे कोवाड बीट अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन  विद्यालयाचे प्राचार्य सी बी निर्मळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. कार्यक्रमाचे स्वागत रवींद्र सावंत तसेच एन जे बाचुळकर यांनी केले. प्रास्ताविक केंद्र समन्वयक वाय आर निटूरकर यांनी केले.
 कचरा मुक्त भारत बनवण्यासाठी तसेच कचऱ्याच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, कचरा व्यवस्थापनाची सवय लागावी, याची सुरुवात बालवयात झाली तर परिवर्तन घडण्यास वेळ लागणार नाही हा उद्देश ठेवून सर्व शाळांमध्ये कचरा व्यवस्थापन पाठ्यक्रम सुरू केला जाणार आहे. त्याबद्दलचे प्रशिक्षण जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना दिले जात आहे. कालकुंद्री येथे झालेल्या प्रशिक्षण वर्गात कोवाड बीट अंतर्गत कालकुंद्री कोवाड कुदनूर या तीन केंद्रातील  प्राथमिक, माध्यमिक शाळेतील प्रत्येकी एका शिक्षकाला याबद्दलचे प्रशिक्षण देण्यात आले. तज्ञ मार्गदर्शक श्रीकांत वै. पाटील (केंद्र मुख्याध्यापक कोवाड), बी.डी. भोगण  (अध्यापक राजगोळी खुर्द),केंद्र प्रमुख डी.आय. पाटील यांनी सोळा आठवडे चालणाऱ्या पाठ्यक्रमावर आधारित व्हिडिओ, अभ्यासक्रमाचा आढावा, विविध चार भागातील तपशील, भागांचे उद्देश, वेळापत्रक, कचऱ्याचे वर्गीकरण, कचरा विघटन, इलेक्ट्रॉनिक कचरा, घातक कचरा, कोरडा कचरा, सेंद्रिय कचरा याबाबत माहिती दिली. श्रीकांत पाटील यांनी प्लास्टिकचा कमीत कमी वापर, पुनर्वापर व कचऱ्यापासून पुनर्निर्मिती यांची माहिती सांगताना कोणत्या वस्तूचे विघटन होण्यास किती वर्षे लागतात याबाबतची माहिती दिली. यात प्लास्टिकच्या बाटली चे विघटन होण्यास चारशे वर्षे लागतात यावरून प्लॅस्टिक  कचऱ्याची समस्या किती गंभीर आहे याची जाणीव करून दिली. यावेळी सर्व संघटना समन्वय समितीचे गोविंद पाटील व दस्तगीर उस्ताद आदींनी या अभियानाच्या  हिंदुस्तान युनिलिव्हर  लिमिटेड  आदी पालक कंपन्यांनी  जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला  कचरा वर्गीकरण साठी  किमान तीन ते चार  मोठ्या कचराकुंड्या द्याव्यात अशी मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत क पा पाटील, मुल्ला,  ए. के. पाटील आदींनी सहभाग घेतला. शंकर कोरी यांनी आभार मानले.

1 comment:

Jayant kasar said...

Vitthal pednekar is a daku chandgad pune 7 carod frowd

Post a Comment