![]() |
राजेश पाटील यांच्या विजयानंतर जल्लोष करताना कार्यकर्ते. |
राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश पाटील यांनी अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांच्यावर मात केली. पण या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी यांनी घेतलेले मताधिक्य सर्वच उमेदवारांना धडकी भरविणारे होते. आजरा व गडहिंग्लज तालुक्यात घेतलेल्या अप्पी पाटील यांनी घेतलेले मताधिक्य पाहता 14 फेरी विजय होणार असे वाटत असतानाच 14 व्या फेरीअखेर त्यांचे मताधिक्य कमी झाल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. चंदगड विधानसभा निवडणूकीत चक्क 14 उमेदवार भवितव्य आजमावत होते.
![]() |
राजेश पाटील यांच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे झेंडे हातात घेऊन जल्लोष करताना कार्यकर्ते. |
सर्वच उमेदवारांनी अत्यंत चुरशीने प्रचार यंत्रणा राबविताना पदयात्रा, रॅली, जाहिर सभा याद्वारे अवघा मतदार संघ ढवळून काढला होता. या मतदार संघात गडहिंग्लज तालुक्यातील गडहिंग्लज शहर व उत्तूर परिसर तसेच आजरा तालुक्यातील काही भाग वगळता अन्य भाग चंदगड मतदार संघात समाविष्ठ होता. त्यामुळे मतदार संघाचा परीघ विस्तारला होता. या मतदार संघात 68 टक्के मतदान झाले होते. परिणामी अनेकांच्या नजरा निकालाकडे वेधल्या होत्या.
![]() |
राजेश पाटील विजयी झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुश्मिता राजेश पाटील हात उंचावून दाखवताना. |
गडहिंग्लज नगरपरिषदेच्या पॅव्हेलियन हॉलमध्ये मतमोजणी सुरू होती. त्यामुळे पोलिस यंत्रणेने 100 मीटर अंतराच्या परिसरात कार्यकर्त्यांना बंदी केलेली असल्याने सकाळपासून कार्यकर्त्यांनी आजबाजूच्या रस्त्यावर गर्दी केली होती. कार्यकर्त्यांच्या झुंडी ध्वनीक्षेपकावरून जाहिर होणार्या प्रत्येक फेरीच्या आकडेवारीनुसार विजयाची समीकरणे जुळवण्यात व्यस्त होते. सुरूवातीच्या काही फेरीत वंचित बहुजन आघाडीचे अप्पी पाटील यांनी आघाडी घेतल्याने अनेक उमेदवार व कार्यकर्त्यांच्या तोंडचे पाणी पळविले होते.
![]() |
फेरीनिहाय मतमोजणीचा निकाल जाहीर होत असताना फोनवरुन संपर्क करत आकडेवारी सांगताना. |
11 व्या फेरीनंतर मात्र चंदगड तालुक्यातील मताधिक्य कधी राजेश पाटील, अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील तर कधी अप्पी पाटील यांच्या बाजूने झुकू लागल्याने कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र त्यानंतरच्या प्रत्येक फेरीत पारडे जड होत गेले. तर अन्य उमेदवार बॅकफूटवर गेले. 19 व्या फेरीचा निकाल जाहिर होताच राजेश यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करत गुलालाची उधळण केली. केवळ पोष्टल मतदानाची आकडेवारी जाहिर होणे बाकी होते. स्वर्गीय आमदार बाबासाहेब कुपेकर यांच्यापासून गडहिंग्लज तालुक्यात गेलेला चंदगड विधानसभेचा गड पुन्हा चंदगडकरांनी सर केल्याने कार्यकर्ते विजयाचा जल्लोश करताना गुलालात माखून गेल्याचे तर गडहिंग्लजात मतमोजणी परिसरातील सर्व रस्ते गुलालमय झाल्याचे चित्र सायंकाळी उशिरापर्यंत पाहण्यास मिळत होते.
![]() |
राजेश पाटील यांच्या पत्नी सौ. सुश्मिता पाटील यांच्यासमवेत उत्साही कार्यकर्ते सेल्फी काढून घेत होते. |
चंदगड विधानसभा मतदारसंघातील मतदानाची फायनल आकडेवारी
अखेर निवडणूक विभागाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या पोष्टल मतदानासह अंतिम निकालाच्या आकडेवारी पुढीलप्रमाणे.............................संग्रामसिंह कुपेकर - 33215
राजेश नरसिंग पाटील - 55558
श्रीकांत कांबळे - 905
अशोक चराटी - 12078
अप्पी पाटील - 43973
अनिरूद्ध रेडेकर - 5133
आप्पासाहेब भोसले - 784
नामदेव सुतार - 584
प्रकाश रेडेकर - 431
महेश नरसिंग पाटील - 1839
रमेश रेडेकर - 10133
शिवाजी पाटील - 51173
सुभाष देसाई - 1470
संतोष पाटील - 1478
नोटाला - 1793
No comments:
Post a Comment