![]()  | 
| कालकुंद्री येथे हायमास्ट सोलर दिव्यांचे उद्घाटन प्रसंगी माजी आमदार राजेश पाटील व मान्यवर | 
चंदगड : सी एल वृत्तसेवा
लोकशाहीत संविधानाने दिलेल्या मताचा हजार पंधराशे रुपयांसाठी बाजार मांडू नका. स्वतःचे मत सवालाने विकणारा मतदार निवडून दिलेला लोकप्रतिनिधी कसाही वागला तरी त्याला कधीच जाब विचारू शकत नाही. असे प्रतिपादन चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांनी केले. ते कालकुंद्री, ता. चंदगड येथे हायमास्ट सोलार लॅम्प लोकार्पण प्रसंगी उद्घाटक या नात्याने बोलत होते.
पाटील यांनी आमदारकीच्या काळात नियोजन मंडळाच्या माध्यमातून तालुक्यातील कालकुंद्री, कुदनूर, अडकूर आदी गावांत मंजूर केलेल्या हायमास्टचे लोकार्पण सध्या सुरू आहे. कालकुंद्री येथे छ. शिवाजी महाराज चौकात ४.४१ लक्ष खर्चाचे २० फूट उंच खांबावर हे चार लाईट बसवण्यात आले आहेत. यावेळी राजेश पाटील पुढे बोलताना म्हणाले मी विविध विकास कामांसाठी मंजूर केलेल्या सोळाशे कोटी रुपयांच्या निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आज गप्प आहेत. या पूर्ण झालेल्या विकास कामांचे लोकार्पण कार्यक्रम विधानसभा निवडणुक होऊऊ वर्ष होत आले तरी अजून संपत नाहीत असे सांगून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा निवडणुकांमध्ये मतदारांनी कामाच्या व्यक्ती पाहून मतदान करावे. असे आवाहन केले.
सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत मुतकेकर, विठोबा पाटील आदी ग्रामपंचायत सदस्यांनी या कामी निधी दिल्याबद्दल माजी आमदार यांचा सत्कार केला. आर. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ग्रामपं सदस्य विलास शेटजी, विनोद पाटील, आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी अशोक पाटील, शरद जोशी, गुरुनाथ पाटील, राजाराम जोशी, गायत्री पाटील, सुखदेव शहापूरकर, एस. एल. पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. मधुकर कोकितकर यांनी आभार मानले. दरम्यान याच दिवशी कुदनूर येथेही उभारलेल्या हायमास्टचे राजेश पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

No comments:
Post a Comment