चंदगड तालूक्यात दुर्गामाता दौडला मोठा प्रतिसाद, युवक - युवतीबरोबर महिलाही सहभागी - चंदगड लाईव्ह न्युज

07 October 2019

चंदगड तालूक्यात दुर्गामाता दौडला मोठा प्रतिसाद, युवक - युवतीबरोबर महिलाही सहभागी

नवरात्रोत्सवानिमित्य चंदगड तालूक्यात चालू असणाऱ्या दौडचे तेऊरवाडी येथे स्वागत करताना माहिला वर्ग व दोडमधील उपस्थित धारक.
तेऊरवाडी / प्रतिनिधी
शिवाजी महाराज की जय !, दुर्गामाता की जय ! असे म्हणत पहाटे पाच पासून चालू असलेल्या दुर्गामाता दौडला चंदगड तालूक्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे .विशेषतः चंदगड तालूक्याच्या पूर्व भागातील गावामधील दौडमध्ये युवकाबरोबरच युवती व माहिला वर्गही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत .
चंदगड बरोबर तालूक्याच्या किणी - कर्यात भागातील कोवाड , तेऊरवाडी , कुदनूर , माणगाव , शिनोळी आदि गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून घटस्थपनेपासून दुर्गामाता दौडला सुरवात होते.पहाटे पाच वाजता प्रेरणा मंत्र म्हटल्यानंतर  या दौडला दोन समांतर रांगा करून सुरवात केली जाते. या दौडमध्ये सहभागी होणाऱ्या ना खूप कडक शिस्तीचे पालन करावे लागते. सर्वाचा पेहराव पांढराशुभ्र असतो. पायात चप्पल वापरायचे नाही, डोक्यावर पांढरी टोपी घालून देशभक्ति गिते म्हणत व विविध देवतांचा नावाचा घोष करत ही दौड गावातील सर्व गल्यातून धावते . दौडच्या अग्रस्थानी भगवा ध्वजधारी असतो. यावेळी सलग नऊ दिवस गावातील सर्व गल्या रांगोळी काढून सजवल्या जातात. त्याबरोबरच या दौडचे स्वागत सुवासिनी आरती ओवाळून करतानाचे चित्र दिसते. बेळगावच्या युवकानी सुरवात करुन दिलेला हा वारसा एक मोठया चळवळीचे रूप घेऊ पहात आहे. शालेय यूवक- युवतींनी या दौड कडे एक मौज म्हणून न पहाता शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान ने चालू केलेल्या या दौडकडे एक व्यक्तिमत्व विकासाचा सुवर्ण मार्ग म्हणून पहावे असे विचार या दौडचे गेल्या विस वर्षापासून आयोजन करणारे तेऊरवाडी येथील दयानंद मारूती पाटील यानी विचार व्यक्त केले. एकंदरीत गेल्या सात दिवसापासून भर पावसातही अखंडपणे ही दौड चालू असल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment