मुरकुटेवाडी येथील मराठी विद्या मंदिरात हदगा उत्साहात संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

07 October 2019

मुरकुटेवाडी येथील मराठी विद्या मंदिरात हदगा उत्साहात संपन्न

मुरकुटेवाडी येथील मराठी विद्या मंदिरमध्ये हदगा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
मराठमोळी संस्कृती लाभलेला आपला महाराष्ट्र.याच महाराष्ट्रातील हदगा हे एक मुलींचे लौकीक व्रत आहे. मुरकुटेवाडी येथील मराठी विद्या मंदिरमध्ये हदगा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.बहरलेल्या सृष्टीवर पावसाळा संपत असतानाच हा हस्ताचा पाऊस पडतो व सर्वांना सुखावून जातो.याच दरम्यान साजरा करतात तो हदगा असे सांगत कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. शितल पाटील तर स्वागत महेश जांबोटकर यांनी केले.
शाळेचे पटांगण रांगोळीनी सजले होते.मुला-मुलींनी आपल्या वेशभूषातुन मराठी संस्कृती जपली होती. सरस्वती मातेचे पूजन करून हदगा गीत, हळदी-कुंकू, दांडीया नृत्य, झीम्मा फुगडी, मुलांच्या डब्यातील इतर मुलांनी खाऊ ओळखणे इ.कार्यक्रम सादर केले. यावेळी मुला-मुलींमध्ये महिलांनी सहभाग घेऊन आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. हदग्याच्या निमित्ताने मराठी संस्कृतीचे दर्शन सर्वांना घडले. महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विलास पाटील, सुरेश चव्हाण, शरद जाधव, आरती जाधव, कविता कांचिडे, वैशाली आपके, लतीका सुरूतकर व सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. आभार अनंत मिलके यांनी मांडले.


No comments:

Post a Comment