चंदगड/प्रतिनिधी
271 चंदगड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसंदर्भातील चुकीचा मेसेज मोबाईल वरून व्हायरल करणाऱ्या अज्ञाता विरोधात नेसरी पोलिसांत अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील(मूळ गाव सावर्डे ता.चंदगड,सध्या रा.हिरानंदानी मिडोज पोखरण रोड 2 ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की - 271चंदगड या विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून शिवाजी पाटील हे निवडणूक लढवत आहेत. पण काल `आ चंदगड विकास प्रतिष्ठान` या व्हॅटस्अप ग्रूपवरून एबीपी माझा या न्यूज चॅनेलचा लोगो वापरून अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांचा महायूतीचे उमेदवार संग्राम कूपेकर यांना पाठींबा जाहीर केला असून यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी मध्यस्थी केली. अशा आशयाचा टाईप केलेला मेसेज प्रसारित करण्यात आला आहे. या बाबत एबीपी माझाच्या कार्यालयाशी संपर्क साधून उमेदवार शिवाजी पाटील यानी माहिती घेतली असता त्यानी अशा प्रकारची कोणतीही बातमी आपल्या चॅनेलवरून प्रसारित केली नसल्याचा खुलासा एबीपीने केला. निवडणुक काळात निकालावर परिणाम व्हावा व बदनामी करण्याच्या हेतूने खोटी व दिशाभूल करणारी माहिती मोबाईल द्वारे प्रसारित केल्याने या अज्ञाताविरोधात नेसरी पोलिसांत शिवाजी पाटील यानी फिर्याद दाखल केली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अज्ञाताचा शोध घेत आहेत
20 October 2019
Home
chandgad
निवडणुकीसंदर्भात चुकीचा मेसेज मोबाईल वरून व्हायरल करणाऱ्या विरोधात नेसरी पोलिसांत गुन्हा दाखल
No comments:
Post a Comment