पावसाच्या शक्यतेमुळे मतदारांनी सकाळच्या सत्रात मतदान करावे - जिल्हाधिकारी दौलत देसाई - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2019

पावसाच्या शक्यतेमुळे मतदारांनी सकाळच्या सत्रात मतदान करावे - जिल्हाधिकारी दौलत देसाई


कोल्हापूर / प्रतिनिधी
सोमवारी पाऊस .पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी सकाळच्या सत्रात बाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले आहे.
सोमवार दि. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत विधानसभेसाठी मतदान होत आहे. हवामान खात्याने उद्या सोमवारी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी सकाळच्या सत्रात मतदानासाठी बाहेर पडावे आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले आहे. सकाळच्या सत्रामध्ये मतदारांनी मतदान केल्यास दुपारी जरी पाऊस पडला तरी बाधा निर्माण होणार नाही. पावसाचा अंदाज गृहित धरुन जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment