![]() |
चंदगड शहरात पाऊस पडत असताना बाजारपेठेत शुकशुकाट होता. |
शहरासह परिसरात आज दुपारी तीन वाजता मोठ-मोठ्या थेंबाच्या पावसाने हजेरी लावली. सकाळपासून कडाक्याचे ऊन पडल्याने उष्म्याने नागरीक हैराण झाले होते. त्यामुळे दुपारी पाऊस होणार होता. आज दुपारी तीन वाजता जोराचा पाऊस झाला. मात्र अर्धा तासातच पावसाचा जोर ओसरला. चंदगड शहरासह नागनवाडी, नांदवडे, हेरे, हलकर्णी, दाटे परिसरात पाऊस झाला. महापुरात वाचलेली पिके सद्या सुधारत असताना या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आता पडत असलेल्या पावसामुळे उरलीसुरली पिकांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा संकट उभे ठाकले आहे.
No comments:
Post a Comment