भगतसिंग ॲकॅडमीचे दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत यश - चंदगड लाईव्ह न्युज

21 October 2019

भगतसिंग ॲकॅडमीचे दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत यश

बेळगाव तालुका सेवा संस्था सुळगा यांच्या वतीने 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना संस्थेचे पदाधिकारी. 
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथील भगतसिंग ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी बेळगाव तालुका विविध कार्य. सहकारी संघ लि. सुळगा यांनी खास दीपावली निमित्ताने घेण्यात आलेल्या दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत यश संपादन केले. कु. दिपाली कृष्णा चव्हाण दुतीय क्रमांक, कु. एकता बाळू पाटील तृतीय क्रमांक मिळवला त्यांना रोख बक्षीस आणि ट्राफी देऊन सत्कार करण्यात आला. या मुली गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील ज्यू महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी येथे शिक्षण घेत आहेत त्यांना प्रा. एम. एस. तायडे सर, प्रा. आर. टी. पाटील सर, प्रा. शिवाजी पाटील सर ,प्रा. सचिन पिटुक सर यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment