दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
माडवळे (ता. चंदगड) येथील श्री रामलिंग नवयुवक कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने खास दीपावलीनिमित्त भव्य कबड्डी स्पर्धा शुक्रवार 25 ऑक्टोबर 2019 रोजी चार वाजता खुल्या व 55 किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. संघातील खेळाडू हे एकाच गावातील असावेत. त्यासाठी प्रत्येक खेळाडूने सोबतआधार कार्ड आणने अनिवार्य आहे. या स्पर्धसाठी अनुक्रमेभव्य आकर्षक रु.11.001, रू.7.001 रू .5001 अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड आकर्षक चषक देण्यात येणार आहे. हौशी कबड्डी पट्टूंनी या स्पर्धाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने केेले आहे.
No comments:
Post a Comment