![]() |
करंजगाव येथील स्वराज्य मित्र मंडळ आयोजित आरोग्य शिबिराचा लाभ घेताना रूग्ण, सोबत मंडळाचे कार्यकर्ते. |
करंजगाव (ता. चंदगड) येथील स्वराज्य मित्र मंडळ व संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटल महागाव यांच्या संयुक्त विद्यमाने करंजगाव येथे पार पडलेल्या सर्व रोग निदान व औषधोपचार शिबिरात परिसरातील 423 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
नेत्ररोग, क्षयरोग, दमा, मुळव्याध, त्वचारोग, संधिवात, थायरॉईड, मुतखडा, हार्निया, अपेन्डिस, सर्दी-खोकला-ताप, आदींसह हिमोग्लोबिन, ब्लड प्रेशर, डोळे आदींची तपासणी व मोफत औषधोपचार देण्यात आले. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक गंभीर रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार करण्यात आले. यावेळी संत गजानन महाराज हॉस्पिटलचे डॉ. विजय गावडे, डॉ. शैलजा गुंजकर, डॉ. अस्मिता कांबळे, डॉ. महेश पाटील व सहाय्यक विशाल अडणूरे, आनंदराव देसाई, रेखा कुंभार, लक्ष्मी माने, अहमद मुल्ला आदींनी सेवा दिली. शिबिर पार पडण्यासाठी स्वराज्य मित्र मंडळाचे कार्यकर्ते मारुती शिट्याळकर, परशुराम गावडे, पांडुरंग गावडे, संजय गुरव, रमेश जाधव, मोहन गावडे,भैरू पाटील, नंदू गावडे, निवृत्ती गावडे, सुनील जाधव, नारायण जाधव, तानाजी जाधव, संदीप गुरव, तानाजीगुरव आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment