आशियातील वचनबध्द व कर्तृत्ववान उद्योगपती म्हणून मानसिंग खोराटे यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

01 November 2019

आशियातील वचनबध्द व कर्तृत्ववान उद्योगपती म्हणून मानसिंग खोराटे यांची निवड

मानसिंग खोराटे
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
टाईम्स ऑफ इंडियाने केलेल्या सर्वेनुसार आशिया खंडातील वचनबध्द व कर्तृत्ववान उद्योगपती म्हणुन कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथील मानसिंग खोराटे यांची निवड करण्यात आली.
श्री. खोराटे हे आजरा तालुक्यातील असून सद्या ते कोल्हापुर येथे स्थायिक आहेत. महाराष्ट्रातील नामवंत साखर व्यापाऱ्याच्या यादीत त्यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. व्यवसायामध्ये कामाचे योग्य नियोजन व दिलेला शब्द वेळत पुर्ण करणे या त्यांच्या स्वभावामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. ८ नोव्हेंबर 2019 रोजी सिंगापुर येथे होणाऱ्या एका खास कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खोराटे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  बरीच वर्ष बंद असलेला हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखाना खोराटे यांनी सहा महिन्यापुर्वी चालवायला घेतला आहे. कारखाना येत्या हगांमात सुरु करण्याच्या दृष्टीने त्यांनी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठीच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना त्यांनी पुर्ण केल्या आहेत. वचनबध्द आणि कर्तृत्त्वान पुरस्कार मिळाल्यामुळे दौलतच्या कामगारवर्गात व सभासदांच्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कामगार वर्गाने त्यांच्या अभिनंदनाचे फलक तालुकाभर लावून त्यांचे अभिनंदन केले आहे. 


No comments:

Post a Comment