चंदगड / प्रतिनिधी
भारत निवडणुक आयोगाने शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या याद्या अद्ययावतीकरणाचे काम सुरु आहे. चंदगड तालुक्यातील नाव नोंदणीसाठी हक्कदार असलेल्या व्यक्तींनी 6 नोव्हेंबर 2019 पूर्वी योग्य त्या कादपत्र पुराव्यासह चंदगड तहसिल कार्यालयात अर्ज जमा करावेत, असे आवाहन तहसिल कार्यालयाच्या निवडणुक विभागाच्या वतीने केले आहे.
पदवीधर व शिक्षक मतदार संघाची यादी प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने तयार करण्यात येत असल्यामुळे या मतदार संघातील सद्या अस्तित्वात असलेल्या मतदार यादीमध्ये ज्या व्यक्तींची नावे समाविष्ट आहेत. अशा सर्व व्यक्तींनी देखील विहीत नमुन्यात नव्याने अर्ज सादर करावा.
पदवीधर मतदारसंघाच्या यादीत नाव नोंदणी करण्यासाठी 1) नमुना 18 मधील विहीत नमुन्यातील अर्ज. 2) निवडणुक ओळखपत्र 3) रहिवाशी पुरावा 4) दोन रंगीत फोटो. शिक्षक मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी 1) विहीत नमुन्यातील नमुना 19 मधील अर्ज 2) किमान तीन वर्षे माध्यमिक शाळेत अध्यापन (शिक्षक) करीत असल्याबाबत शाळाप्रमुखांचे प्रमाणपत्रासह अर्ज भरुन चंदगड तहसिल कार्यालयामध्ये मुदतीमध्ये जमा करावेत असे आवाहन पदनिर्देशित अधिकारी तथा तहसिलदार विनोद रणावरे यांनी केले आहे.
शुक्रवारी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन ..........
गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. 1) सकाळी दहा वाजता नाव नोंदणीबाबत आराखडा व मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक तहसिल कार्यालय चंदगड येथे आयोजित केली आहे. सदर बैठकीला सर्व कार्यालय प्रमुख व पर्यवेक्षक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment