आम्ही म्हाळेवाडीकर ग्रुपने दिला पक्याच्या गरीब कुटुंबाला मदतीचा हात, ५० हजाराची ठेव जमा - चंदगड लाईव्ह न्युज

01 November 2019

आम्ही म्हाळेवाडीकर ग्रुपने दिला पक्याच्या गरीब कुटुंबाला मदतीचा हात, ५० हजाराची ठेव जमा

म्हाळेवाडी येथे मयत शेतकऱ्यांची पत्नी प्रेमा पाटील याना "आम्ही म्हाळेवाडीकर" या ग्रुपच्या सदस्यांनी जमा केलेल्या मदतीची ठेव पावती देताना बी. आर. पाटील,बाजूला ग्रुपचे सदस्य व ग्रामस्थ.
नंदकुमार ढेरे, चंदगड
मोबाईलवरील व्हॅटस्अप ग्रुप म्हणजे टाईमपास, मनोरंजन किंवा चॅटींग करणारं साधन म्हणून बघितले जाते.पण  मोबाईल वर "आम्ही म्हाळेवाडीकर" या व्हॅटस्अप ग्रूपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या म्हाळेवाडी ता.चंदगड येथील तरूणांनी या गोष्टीला छेद देत गावातीलच एका गरीब शेतकर्याला  पन्नास हजार रूपयांची आर्थिक मदत देवून माणूसकीचे दर्शन घडवले.या ग्रुपवरील तरूणानी केलेली मदत ही मोबाईलवर टाईमपास करणार्या तरूणाना आदर्श ठरणारी आहे.
म्हाळेवाडी ता.चंदगड येथील  प्रकाश गणपती पाटील( वय -38)  या गरीब शेतकर्याचे 8 जुलै 2019 रोजी आकस्मिक निधन झाले. त्यामुळे त्याचा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.घरच्या कर्त्या  पुरूषाच आधार तुटल्याने हतबल झालेल्या प्रकाश च्या पत्नी समोर दोन मुलांचे  शिक्षण कसे करायचे असा प्रश्न पडला होता.पण गावातीलच नोकरी,शिक्षणानिमित्त बाहेरगावी असणार्या तरूणानी "आम्ही म्हाळेवाडीकर " या ग्रूपवरून मदत करण्यासंदर्भात चर्चा केली.  मयत प्रकाश याच्या दोन मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी या उदात्त हेतूने मदत करण्याचे ठरवले. एक मुलगा सहावी तर दुसरा मुलगा दुसरी मध्ये शिकत आहे.   व्हाट्सएप ग्रुप च्या माध्यमातून गावातील  सर्वच स्तरावरील तरुणानी आर्थिक मदत केली. आवाहनला प्रतिसाद देत तरूणांनी पन्नास हजार रूपये मदत जमा केली.जमा झालेली मदत म्हाळेवाडी येथील जिल्हा मध्यवर्ती  बॅकेच्या शाखेत  पत्नी प्रेमा पाटील यांचे नावे दामदूप्पट ठेवण्यात आली.ठेवीची पावती काल ग्रामस्थांच्या समोर प्रकाशची पत्नी प्रेमा याना बी.आर.पाटील,यांच्याहस्ते देण्यात आली.यावेळी डी.एल.पाटील,एम.व्ही.कानूरकर, अरूण मर्णहोळकर,यासह ग्रुप चे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment