![]() |
कोवाड येथील पुरग्रस्तांना सुरेश वांद्रे यांच्या हस्ते मदत करताना वर्ग मित्र मंडळ. |
कालकुंद्री / प्रतिनिधी
ऑगस्ट महिन्यात कोवाड (ता. चंदगड) येथील सर्व नागरिक महापुराच्या आसमानी संकटाला तोंड देत होते. अशा परिस्थितीत कोवाड अणि परिसर पूरग्रस्तांच्या मदतीत धावून आला होता. त्यानंतर समाजातील सर्वच स्तरातुन पुरग्रस्थ कुटुंबांना विविध स्वरुपाच्या मदतीसाठी शेकडो हात पुढे आले. आजही मदत सुरूच आहे.
कोवाड येथील चंदगड तालुका पत्रकार संघाचे सदस्य व छायाचित्रकार संजय म. पाटील यांच्या पुढाकाराने १९९३ सालातील कृषि पदविका अभ्यासक्रमातील जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील त्यांचे सर्व वर्गमित्र पुरग्रस्थ पिडीत लोकांच्या मदतीसाठी सरसावले आहेत.
ग्रामसेवक, कृषि सहायक, तलाठी पदावर विविध ठिकाणी नोकरी करत असलेल्या या मित्रांनी रामा पाटील, गंगुबाई व्हन्याळकर आणि अंजना बागड़ी या पुरग्रस्त कुटुंबाना कोवाड भाजपचे शहर प्रमुख सुरेश वांद्रे यांच्या उपस्थितीत पुरग्रस्तांना मदत देवून सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शिवाजी पाटील, निवास कदम, रामचंद्र मगदुम, आदम नाइकवाड़ी, सुनील साठे, अशोक गवळी, विकास जोशीलकर, अशोक गुरव, दीपक कोळी, उत्तम चाळके, मछिंद्र कुंभार, विश्वास कासोटे अणि संजय पाटील आदी मित्रांचा समावेश आहे. यापुढेही अशीच विधायक कार्य करणार असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment