सीमा भागातील मराठी बांधवासाठी हलकर्णी फाट्यावर रास्ता रोको - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2019

सीमा भागातील मराठी बांधवासाठी हलकर्णी फाट्यावर रास्ता रोको

हलकर्णी (ता. चंदगड) येथे चंदगड तालूक्यातील युवकांनी 1 नोव्हेंबर रोजी रास्तारोको अंदोलन करून कर्नाटकातील मराठी बांधवाना पाठींबा व्यक्त केला. 
चंदगड / प्रतिनिधी
कर्नाटकात राहणाऱ्या मराठी बांधवानी 1 नोव्हेंबर या काळ्यादिनी पाठींबा  देण्यासाठी आज हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथे तालूुक्यातील युवकांनी रास्ता रोको आंदोलन करून पाठींबा दिला.काळ्या फिती लावून यूवक या अंदोलनात सहभागी झाले होते.सकाळी 11वाजता बेळगाव-वेगूर्ला महामार्गावर हलकर्णी फाट्यानजीक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी प्रताप उर्फ पिनू पाटील यानी कर्नाटक सरकारने मराठी बांधवावरील अत्याचार थांबवावेत,तर सरपंच विष्णू गावडे यानी सीमाप्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी असे आवाहन केले,तर संदीप पाटील यानी निपाणी,कारवार,बिदर,भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीचा महाराष्ट्र व कर्नाटक सरकारने संयुक्त विचार करून सीमाप्रश्न सोडवून मराठी भाषिकांवर होणारा अन्याय थांबवावा अशी मागणी केली. यावेळी विवेक मनगूतकर, डॉ एन.टी. मुरकुटे , संदीप  नांदवडेकर, विश्वनाथ ओउळकर, मधूकर सावंत,बयापा पाटील ,परशराम पाटील, संतोष सुतार , निवृत्ती हरकारे,यासह तालुक्यातील सर्व तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी  अंदोलन कर्त्या यूवकाना पोलिसांनी   ताब्यात घेतले.अंदोलनामूळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

No comments:

Post a Comment