वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणला व्यापारी संघटनेचे निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

08 November 2019

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणला व्यापारी संघटनेचे निवेदन


कोवाड / प्रतिनिधी 
वारंवार खंडीत होणारा विज पुरवठा सुरळीत व्हावा, या मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन आज येथील व्यापारी संघटनेच्यावतीने महावितरणला देण्यात आले. सहाय्यक अभियंता अजित कांबळे यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले व मागण्यांची गांभिर्याने दखल घेण्याचे आश्वास दिले. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम यांनी उपअभियंता विशाल लोदी यांच्याशी फोनवरुन संपर्क केला व व्यापारी वर्गाच्या मागण्यांची माहिती दिली. त्यावर उपअभियंता लोदी यांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुधवारी (ता. १३) रोजी  कोवाड येथे बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर व्यापारी माघारी फिरले.
कोवाड ही तालुक्यातील मोठी बाजारपेठ आहे. बाजारपेठेत छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची संख्या जास्त आहे . पण वारंवार विज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडतात. याचा व्यापारावर परिणाम होत असल्याने आज संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने विज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनातन व्यापारी वर्गाने विज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे . तसेच विज बिलांची चुकीच्या पध्दतीने आकारणी होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. कोवाडचा विज पुरठा स्वतंत्र फिडरवरुन करावा. विज कंपनीचे कार्यालय पूर्वीच्या ठिकाणी बाजारपेठेत सुरु करावे. गणपती मंदिराजवळ दुकान गाळ्याना लागून असलेल्या विद्युत वाहिनी बाजूला कराव्यात तसेच महापूराच्या कालावधीतील ऑगस्ट व स्पटेंबर महिन्यांची विज बिले माफ करावीत आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

No comments:

Post a Comment