पुणे येथील विभागीय उपायुक्तपदी आर. पी. झेंडे यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

08 November 2019

पुणे येथील विभागीय उपायुक्तपदी आर. पी. झेंडे यांची निवड

आर. पी. झेंडे
चंदगड /प्रतिनिधी 
झेंडेवाडी (ता. चंदगड)  येथील आर. पी. झेंडे यांची पुणे विभागीय कार्यालयामध्ये उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदासह अन्य पदांवरही त्यांनी काम केले होते. यानंतर त्यांनी पुणे आणि मुंबई येथील विविध शासकीय पदांवर काम करत आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल त्यांचे चंदगड तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment