चंदगड लाईव्हच्या बातमीचा परिणाम,चंदगड ते चंदगड फाटा रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

08 November 2019

चंदगड लाईव्हच्या बातमीचा परिणाम,चंदगड ते चंदगड फाटा रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ

चंदगड ते चंदगड फाटा रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड ते चंदगड फाटा या अडीच की.मी रस्त्यावर प्रचंड प्रमाणात जागोजागी पडलेल्या खड्यामुळे वाहने तर सोडाच दिवसाच्या प्रकाशात या रस्त्यावरुन माणसाला सुध्दा चालने मुश्कील झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभारावर प्रकाशझोत टाकणारी बातमी बुधवारी (ता. 6) चंदगड लाईव्ह न्युजने प्रसिध्द केली होती.
                                      चंदगड लाईव्ह न्युज बातमीचा परिणाम

त्याचबरोबर त्यापूर्वी व्हीडीओ न्युजही प्रसिध्द केली होती. रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली रस्त्यावरील खड्डे भरले जात नसल्याने लोकांनी संताप व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध केलेल्या लक्षवेधी बातमीची बांधकाम विभगाने अखेर दखल घेवून आज शुक्रवारी खड्डे भरण्याच्या कामास सुरुवात केली आहे. चंदगड लाईव्ह न्युजने या कामी पाठपुरावा केल्याने आज प्रत्यक्ष रस्त्यातील खड्डे प्रत्यक्ष सुरवात झाली आहे. चंदगड लाईव्ह न्युजच्या पाठपुराव्याबदद्ल प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment