चंदगड / प्रतिनिधी
कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथे ग्रामदैवत रवळनाथ मंदिरात अज्ञातांनी चोरी करुन 22 हजार रुपयांची रक्कम लंपास केली. 7 नोव्हेंबर रात्री साडेसात ते 8 नोव्हेंबर 2019 सकाळी सातच्या दरम्यान हि घटना घडली. याबाबतची तक्रार मंदिर कमिटीचे सदस्य मारुती बाळगिरी बुवा यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून मंदिरात प्रवेश केला. मंदिराच्या गांभाऱ्यातील दानपेटी कटावणीने फोडून त्यातील 22 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून सहाय्यक फौजदार श्री. नाईक तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment