![]() |
रोज पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे शिवरात दलदलीचे साम्राज्य पसरले आहे. |
नंदकुमार ढेरे / चंदगड - प्रतिनिधी
परतीच्या दिवसाने आठवडाभरापासून चंदगड तालुक्यात हाहाकार माजवला असून उरली सूरली भात व नाचना शेतीचे मोठेे नुकसान झाले आहे. जुलै- ऑगस्ट महिन्यात झालेेेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठची पिके कूजून गेली होती.माळरानावर असलेली भात, भुईमूग, नाचनाा, सोयाबीन हि पिके कापणीला आली होती. पण परतीच्या. मात्र पावसाने आठ दिवस तालुक्यात झोडपल्यानेे शिवाार शेतीसह मााळराानाच्या शेतामध्येही पाणी साचले आहे. या पाण्याामूळे शिवारात पााणी साचून शेतात दलदलीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे भाताची सूगी महीनाभर लांबणार आहे.
निसर्गच शेतकऱ्यांच्या सुगीला अनेक संकटे आणत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून जास्त दिवस भात कापणी राहिली तर भात गळतीला जोर लागण्याची शक्यता आहे. यावर्षी पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. जुलै - ऑगस्ट महिन्यात २० ते - ३५ दिवस सर्व शिवार पाण्याखाली राहिला. त्यामुळे ऊस, भात, नाचणा इत्यादी पिके कुजून गेली १५ ऑगस्ट नंतर पाण्याखालील पिके थोडी फार सावरतील असा अंदाज असताना यावर्षी अतिवृष्टी होऊन पिकांची वाढ खुंटली. त्यातून सावरून काही भातपिकांवर शेतकऱ्यांनी औषधे यांचा योग्य वापर करून आपल्याकडे रक्कम गुंतवणूक पिके काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दिवाळी अगोदर पुन्हा परतीच्या पाऊस मोठ्या प्रमाणात लागल्यामुळे पोटरीवर त्यांचा परिणाम झाला. ओढे, झरे, पुन्हा प्रवाहित झाले. शिवारात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी झाले आहे . सध्या जरी पाऊस गेला असला तरी, भाताच्या शेतात पाणी असल्याने भात कापणे, वाळवणे आणि त्याची मळणी घालणे हे शेतकऱ्यांसाठी मोठे संकटच आहे. वाफ्यातील पाणी सुकण्यासाठी ओढे झरे यामधील पाणी कमी झाले तर शिवारातील उंबळट ' कमी होणार आहे. या वर्षाच्या पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांच्या घरात येईपर्यंत पावसाने - अनेक प्रकारची संकटे निर्माण केली. यावर्षीच्या पावसामुळे शेतकरी पूर्णत: आर्थिक अडचणीत आला असून परतीच्या पावसामुळे सुगी लांबणीवर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.
![]() |
नंदकुमार ढेरे, चंदगड-प्रतिनिधी |
No comments:
Post a Comment