हत्तींचे संग्रहित छायाचित्र |
खालसा गुडवळे (ता. चंदगड) परिसरात हत्तीने शेतात धुमाकूळ घालून शेतकऱ्यांना जेरीस आणले असून महापुरानंतर हत्तींकडून नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचे ऊस, भात पिकांबरोबरच घरासमोर लावलेल्या बैलगाडीगाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हत्तीचा मुक्काम याच भागात असतानासुद्धा वनविभाग कानाडोळा करत असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत. विष्णू लक्ष्मण गावडे, बाबाजी धुरी, चंद्रकांत कांबळे, दत्तू धुरी या शेतकऱ्यांच्या पिकांचे हत्तींकडून रोजच नुकसान सुरू आहे. त्यामुळे शेती करावी की सोडून द्यावी अशा मानसिकतेत येथील शेतकरी आहे. हातातोंडाशी आलेली पिके हत्तीकडून जमीनदोस्त केली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे होणाऱ्या शेतीची नुकसानभरपाई बाजारभावाप्रमाणे मिळावी व वनविभागाने हत्ती हटाव मोहीम काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment