हलकर्णी येथे 37 वा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम संपन्न
चंदगड / प्रतिनिधी
![]() |
हलकर्णी (ता. चंदगड) येथे अथर्व इंटरट्रेड लिज्ड दौलत साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयवर अग्निप्रदीपन करताना चेरअमन मानसिंगराव खोराटे व इतर मान्यवर. |
दौलत कारखाना अनेक अडचणीतून व शेतकरी, कामगारांच्या भल्यासाठी एक आव्हान म्हणून चालविण्यास घेतला आहे. हे करताना अनेक संकटे आली, मात्र चंदगडच्या प्रामाणिक जनतेने टाकलेल्या विश्वासामुळे दौलत सुरु करु शकलो. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वास संपादन करुन दौलतचा या वर्षाचा हंगाम यशस्वी करणार आहे. जिल्ह्यातील इतर कारखान्याप्रमाणे आम्ही त्यांच्या एक दिवस अगोदर उत्पादकांच्या गाळप झालेल्या ऊसाचे पैसे देणार असल्याचे अर्थवचे चेअरमन मानसिंगराव खोराटे यांनी सांगितले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड लिज्ड दौलत साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या बॉयवर अग्निप्रदीपन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
प्रारंभी स्वागत कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी केले. अथर्वचे संचालक अजय देसाई व सौ. अमृता देसाई यांच्या शुभहस्ते अग्निप्रदिपन सोहळा पार पडला. चेअरमन श्री. खोराटे पुढे म्हणाले, ``यावर्षी शेतकऱ्यांच्या गाळपास आलेल्या ऊसाचे पैसे तात्काळ देण्याचे नियोजन होते. दौलत कारखाना दुरुस्तीचा नियोजित खर्च वाढला. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे रोखीने देण्याला यावर्षी अडचण येणार आहे. जिल्ह्यातील इतर कारखान्याप्रमाणे आम्ही त्यांच्या एक दिवस अगोदर उत्पादकांच्या गाळप झालेल्या ऊसाचे पैसे देणार आहे. शेतकऱ्यांनी जो विश्वास टाकला आहे. तो सार्थ ठरविण्यासाठी राजकारण विरहीत दौलत चालविणार आहे. शेतकऱ्यांची दौलत शेतकऱ्यांचीच रहावी यासाठीही मी प्रयत्न करणार आहे. यावर्षी झालेल्या महापुरामुळे ऊसाचे उत्पादन कमी आहे. मात्र कारखाना अधिक काळ सुरु राहावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी इच्छा व्यक्त करुन ते पुढे म्हणाले, ``आम्ही कारखाना जसा आहे, त्या स्थितीत स्विकारला आहे. कारखाना घेतल्यानंतर दोन महिन्यापेक्षा अधिक काळ कोणत्या मशिनरी लागणार हे समजण्यात गेले. पण आता कारखान्यातील मशिनरींचे काम पुर्ण झाले आहे. 162 कोटी रुपये मी कारखान्यामध्ये गुंतवले आहेत. कारखाना उत्तम पध्दतीने चालविण्यासाठी ज्या गोष्टी करण्याची आवश्यक आहे. त्या करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ऊस तोडणीसाठीच्या टोळ्या यायला सुरवात झाली आहे. या चार ते पाच दिवसात संपुर्ण टोळ्या येणार आहेत. येत्या 14 किंवा 16 नोव्हेंबर 2019 रोजी मोळी पुजन करुन कारखाना चालू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.`` यावेळी सचिन पाटील, मनोहर होसूरकर, महदेव कांबळे, अनिल होडगे, राजू पाऊसकर आदीसह शेतकरी कामगार, तोडणी वहातूकदार व ठेकेदार उपस्थित होते.
14 किंवा 16 नोव्हेंबर रोजी गाळपाला प्रारंभ करणार .............खोराटे
दौलत कारखाना या हंगामात कोणत्याही परिस्थितीत सुरु करण्यासाठी अथर्वकडून प्रयत्न केले. यासाठी शेती, घर व अन्य गोष्टी कारखाना सुरु करण्यासाठी गहाण ठेवून पैसा उभे केला. या कारखान्यासाठी मी सर्वस्व पणाला लावले आहे. त्यामुळे सर्वांनी कारखान्यासाठी मला मदत करावी. 14 किंवा 16 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष गाळपाला प्रारंभ करणार असल्याचे श्री. खोराटे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment