रविंद्र पाटील |
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय कविसंमेलन बेळगाव येथे *शनिवार दि.१६ नोव्हेंबर रोजी होणार असून, साहित्य परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव* यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन रंगणार आहे. अशी माहिती साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याचे राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांनी दिली.
शनिवार दि.१६ नोव्हेंबर २०१९ रोजी बेळगाव येथील '' वाङमय चर्चा मंडळ " , किर्लोस्कर रोड येथे दुपारी २.०० वा. होणा-या विशेष कविसंमेलनाला सुप्रसिद्ध मराठी नाट्य चित्रपट अभिनेते वसंत अवसरीकर, साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व चित्रपट दिग्दर्शक शरद गोरे, शेतकरी कवी राजेंद्र सोनवणे उपस्थित राहणार आहेत. कवी दशरथ यादव हे सध्या गाजत असलेल्या वारीच्या वाटेवर या महाकांदबरीचे लेखक असून, उन्हातला पाऊस, शिवधर्मगाथा, यादवकालीन भुलेश्वर, सुतसंस्कृती, घुंगुरकधा, मातकट, गुंठामंत्री, पोवाडा पुरुषोत्तमाचा, लेखणीची फुले, बालाघाटचा सिंह, आदी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. ढोलकीच्या तालावर सिनेमासाठी गीत लेखन केले असून, रणांगण सिनेमाचे संवाद व पटकथा त्यांची आहे. पत्रकार, कवी, लेखक, कांदबरीकार, इतिहास संशोधक, नाटककार, वक्ता, गीतकार असे अष्टपैलू साहित्यिक म्हणून त्यांची राज्यभर ओळख आहे.
मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करुन सामाजिक बांधिलकी जोपासत नव समाजनिर्मितीसाठी काम करणा-या या साहित्य *परिषदेचे बारा हजार कवी,लेखक,पत्रकार सभासद असून, ३५० शाखा आहेत*. गेली पंचवीस वर्षे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन वेगवेगळ्या जिल्ह्यात भरविले जाते. त्याशिवाय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन (खानवडी ता.पुरंदर) छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन (पुरंदर), छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन,(पुणे) आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक साहित्य संमेलन,(सासवड) लोकनेते शरद पवार कृषी साहित्य संमेलन,(बारामती) ग्रामीण मराठी साहित्य संमेलन (नगर), जिल्हा साहित्य संमेलन (नाशिक), युवा साहित्य संमेलन (चंद्रपूर) परिवर्तन साहित्य संमेलन (सांगली) डाँ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलन (ठाणे) अशी छोटी मोठी साहित्य संमेलने राज्यभर घेतली जातात. काव्यस्पर्धा, कार्याशाळा, पुरस्कार वितरण समारंभ, कविसंमेलने असे विविध उपक्रम राबविले जातात. कवि मुलांच्या भेटीला हा साहित्य परिषदेचा उपक्रम राज्यभर सुरु आहे.
सदर या कवी संमेलना सहभागी होण्यासाठी आपली दर्जेदार एक कविता व्हॉट्सअॅप नं .9591929325 व इ मेल ravimp2021@gmail.com यावर पाठवावीत. या काव्य संमेलनात उत्कृष्ट काव्याला एक कवी व एक कवियत्रीचा ' शिवसंदेश काव्य पुरस्कार ' देवून गौरविण्यात येणार आहे. यासाठी कविता पाठविण्याची शेवटची तारीख १४ / ११ / २०१९ पर्यंत असेल यांची नोंद घ्यावी. नवोदित कवि लेखकांना संधी देऊन त्यांच्या लेखनाला बळ देण्याचे काम साहित्य परिषदेच्या वतीने केले जाणार आहे. खेड्या पाड्यातील साहित्यिकांना संधी देऊन शेता शिवारातील साहित्याला न्याय देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा उद्देश परिषदेचे आहे. मराठी भाषा, संस्कृतीचे संवर्धनासाठी तसेच बेळगांव तालुक्यात संमेलन भरविली जातात. मात्र बेळगाव शहरात लवकरच राज्यस्तरिय संमेलन भरविण्याचा मानस असल्याचे सांगून बेळगाव परिसरातही बेळगांव जिल्हा कार्यकारणीचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुधिर चव्हाण व महिला जिल्हाध्यक्षा साधना सपारे परिषदेचे काम जोमाने वाढविणार असल्याचे राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment