बेळगाव जिल्हा अभामसा परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी ॲड सुधीर चव्हाण, उपाध्यक्षपदी डी. बी. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

11 November 2019

बेळगाव जिल्हा अभामसा परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी ॲड सुधीर चव्हाण, उपाध्यक्षपदी डी. बी. पाटील

कार्याध्यक्षपदी महादेव चौगुले, सचिवपदी रणजित चौगुले
मजरे कार्वे / प्रतिनिधी
बेळगांव येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगांव जिल्हा नूतन कार्यकारणी मंडळाची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी शिवसंत संजय मोरे होते.
बेळगांव कार्याध्यक्षपदी महादेव चौगुले ,जिल्हाध्यक्ष म्हणून अॅड. सुधीर चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदी डी.बी. पाटील , सचिवपदी रणजित चौगुले , सहसचिव म्हणून संजय गुरव , खजिनदारपदी एम.वाय.घाडी , कार्यकारणी सदस्य म्हणून एल.पी. पाटील , संजय मोरे , गणेश दड्डीकर , एम .के. पाटील , मोहन अष्टेकर , गोपाळ चौगुले , संदिप तरळे, संजय गौडाडकर , स्वप्निल जोगाणी यांची निवड करण्यात आली.
बेळगांव येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदच्या वतीने १६ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन बेळगांव किर्लोस्कर रोड येथील वाङमय चर्चा मंडळ येथे दुपारी २़.०० वा. आयोजित केले आहे. यावेळी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन रंगणार आहे. तसेच विशेष कविसंमेलनाला सुप्रसिद्ध मराठी नाट्य चित्रपट अभिनेते वसंत अवसरीकर, साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व चित्रपट दिग्दर्शक शरद गोरे, शेतकरी कवी राजेंद्र सोनवणे उपस्थित राहणार आहेत. तसेच कवी संमेलन उद् घाटन कार्यक्रमाला लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष व जेष्ठ पत्रकार अशोक याळगी अध्यक्षपद भूषविणार आहेत. 
सीमाभागातील बेळगांव शहरात साहित्य संमेलन भरून भाषा , संस्कृती व परंपरा जतन व संवर्धन करणे व नवोदित कवी , कवियत्रींना व्यासपीठ देणे, वर्षभरात साहित्यिक कार्यशाळा व ,साहित्य संमेलन भरविणे. एक कवी व एक कवियत्री ला' शिवसंदेश काव्य पुरस्कार'  देवून गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती साहित्य परिषदचे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली. या कवी संमेलन यशस्वी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. उद्या सोमवार दि. ११ नोव्हेबर रोजी सायंकाळी ७ वाजता नियोजनाबाबत 'शिवालय 'येथे बैठक बोलविण्यात आली आहे. बेळगाव जिल्हातील मराठी साहित्य संमेलन भरविणाऱ्या साहित्य मंडळाचा सन्मान करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी सुत्रसंचालन एल.पी.पाटील यांनी केले तर शेवटी आभार मोहन अष्टेकर यांनी मानले.


No comments:

Post a Comment