आजरा कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रा.सुनिल शिंत्रे यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

11 November 2019

आजरा कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रा.सुनिल शिंत्रे यांची निवड

प्रा. सुनिल शिंत्रे
आजरा  / प्रतिनिधी
आजरा येथील शेतकरी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रा. सुनील अर्जुन शिंत्रे यांची निवड झाली. सत्ताधारी व विरोधी संचालक यांनी समन्वयातून मार्ग काढीत अध्यक्षपदी प्रा. शिंत्रे यांची निवड केली. 
आजरा कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाल्यानंतर प्रा. सुनिल शिंत्रे यांचा सत्कार करताना डॉ. जाधव व 
संचालक.
आजरा साखर कारखान्याच्या रिक्त अध्यक्ष पदाची निवड आज  दुपारी १ वाजता झाली. कोल्हापूर  प्रादेशिक साखर सहसंचालक डॉ. एस. एन. जाधव हे निवड सभेच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. जाधव यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष प्रा. शिंत्रे यांचा सत्कार करण्यात आला. माजी अध्यक्ष अशोक चराटी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा १५ जुलै रोजी राजीनामा दिला. त्यानंतर अध्यक्ष निवडीसाठी ४ सप्टेंबर रोजी सभा बोलविली होती. 

पण सर्वच संचालकांनी पाठ फिरविल्याने अध्यक्ष निवड होऊ शकली नाही. त्यातच कारखान्याच्या एकदंरीत कारभारावरून आजरा साखर नेहमी चर्चेत आहे. गेले दोन दिवस अध्यक्ष निवडीबाबत सत्ताधारी व विरोधी संचालकांत वेगवेगळया ठिकाणी खलबते झाली. आजरा साखर कारखाना वाचविण्याच्या दृष्टीने सर्वच संचालकांनी एकत्र येऊन एकदिलाने काम करण्याचे ठरले.


No comments:

Post a Comment