हत्तींचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने कोल्हापूर उपवनसंरक्षकांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

13 November 2019

हत्तींचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने कोल्हापूर उपवनसंरक्षकांना निवेदन

चंदगड तालुक्यातील शेती जंगली प्राण्यांकडून वाचवावी या मागणीचे निवेदन कोल्हापूरचे उपवनसंरक्षक एस. जी. धुमाळ यांना देताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे व सहकारी. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात हत्ती, गवे यासारख्या वन्य प्राण्यांकडून शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांचा कायम स्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी कोल्हापूरचे उपवनसंरक्षक एस. जी. धुमाळ यांच्याकडे निवेदनातून कोल्हापूर येथे केली आहे. 
चंदगड तालुक्यातील खामगाव व गुडवळे या गावांमध्ये हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हत्ती पासून होणारे शेतीचे नुकसान व जीवित हानी रोखण्यासाठी वनखाते अपेशी ठरत आहे. शेतीच्या नुकसान भरपाई मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे व प्रत्यक्ष मिळणारे नुकसानभरपाई पाहता हि त्रासदायक आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. 
यासाठी मुख्यवनसंरक्षक, उपवनसंरक्षक, प्रांताधिकारी, तहसिलदार यांची संयुक्त बैठक पंचायत समिती येथे तातडीने घ्यावी. चंदगड तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांच्याकडून नुकसान झाल्यानंतर वनविभागाने 7 बारा 8 अ चा उतारा ही कागदपत्रे वन खात्याने महसूल खात्याकडून घेवून पंचनामा नंतर आठ दिवसात बाजारभावाप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी. वन विभागाने दिलेली  हत्ती प्रतिबंध वाहन यांच्या संख्येत वाढ करावी. ऊस, भात, नाचना, काजू, केळी, बटाटा इत्यादी पिकांची बाजारभावाप्रमाणे भरपाई द्यावी, चंदगड तालुक्याचा सर्वे करून हत्ती व वन्यप्राण्यांकडून वारंवार नुकसान होणारी गावे कायमचे वन्य प्राणी नुकसान क्षेत्र म्हणून जाहीर करून तो अहवाल राज्य सरकारला द्यावा. त्यांच्यासाठी दर एकरी वार्षिक उत्पन्न व भागातील शेतकऱ्यांना द्यावेत. हत्तीच्या बंदोबस्तासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करावे. यासारख्या मागण्यांचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. देवणे यांनी वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. धुमाळ यांना दिले आहे. 

No comments:

Post a Comment