हत्तीना मुळ अधिवासात पाठविण्यासाठी वनविभागाची मोहीम, गुडवळे ग्रामस्थांमुळे वनखात्याला जाग - चंदगड लाईव्ह न्युज

14 November 2019

हत्तीना मुळ अधिवासात पाठविण्यासाठी वनविभागाची मोहीम, गुडवळे ग्रामस्थांमुळे वनखात्याला जाग

गुडवळे ग्रामस्थांच्या अंदोलनानंतर वनखात्याला जाग
चंदगड तालुक्यातील हत्तींना मुळ अधिवासात पाठविण्यासाठी वनविभागाच्या वतीने मोहिमेत सहभीग कर्मचारी. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्याती वनहत्तींचा  उपद्रव वाढला असून शेतकर्याच्या पिकांचे, शेती साहित्य , केळी व काजू झाडे आदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू आहे. नुकसानग्रस्त शेतकर्याना मिळणारी भरपाई म्हणजे शासनाकडून शेतकर्याच्यी थट्टाच चालवली आहे. गेली दह-बारा वर्ष हत्ती, गवे यांच्या नुकसानीने चंदगड तालूक्यातील विशेषता हेरे,खामदळे,झांबरे,उमगाव,वाघोत्रे,इसापूर, खालसा गूडवळे, पार्ले,कळसगादे, जेलूगडे,पाटणे,कलिवडे, किटवडे,जंगमहट्टी, आंबेवाडी आदीसह तालुक्याच्या पश्चिमेस असलेल्या गावातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.हत्तीच्या नूकसानीला कंटाळून सोमवारी (दि.११ रोजी) चंदगड च्या वनकार्यालयावरच शेतकर्यानी बायका मूलासह मोर्चा काढून अधिकार्यांनाच वेठीस धरले.या अंदोलनाचा धसका घेऊन वनखात्याने या हतीना जंगलात (मूळ अधिवासात) हुसकावून लावण्यासाठी हत्ती हटाव मोहीम हाती घेतली आहे.

उपवनसंरक्षक  एच . जी . धुमाळ  कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली  युवराज पाटील , वनक्षेत्रपाल फिरते पथक कोल्हापुर यांचे पथक . दत्ता पाटील , वनक्षेत्रपाल पाटणे यांचे पथक तसेच चंदगड वनरिक्षेत्रातील वनकर्मचारी यांची दोन पथके तैनात केली असून Wildlife Rescue Van व इतर तीन वाहनांची उपलब्धी करणेत आली आहे . वनहत्ती टस्कर - १ व ५ हत्तीचा कळप यांना मालकी शेतात येणेस अटकाव करणे , शेतपीके व स्थावर मालमत्ता यांचे नुकसान टाळणेकरीता सदर हत्तींना त्यांचे नैसर्गिक अधिवासात पिटाळन लावणे . सदर मोहीमेचा  उददेश असलेचे चंदगड वनक्षेत्रपाल  . डी . जी . राक्षे यांनी सागितले .या मोहीमेसाठी आवाजाचे बॉम्ब , रॉकेट , सुरबाण , टायगर बॉम्ब , आगीचे पलोते , मिरचीपूड , मधमाशा व वाघाच्या आवाजाचे मेगा फोन , सर्च लाईट , ढोल ताशे , पत्र्याचे डब्बे इ . साहीत्याचा वापर केला जाणार आहे . हत्तींच्या ठिकाणाचा अंदाज घेणेसाठी ड्रोन कॅमे - या वापर करणार असलेचे वनक्षेत्रपाल चंदगड यांनी सागितले . सदर मोहिमेकरिता एक सहा . वनसंरक्षक , तीन वनक्षेत्रपाल , ८ वनपाल , २० वनरक्षक व ३० वनमजुर यांची नेमणुक करणेत आलेली आहे.


No comments:

Post a Comment