चंदगड तालुक्यातील शेतकरी मळणीत व्यस्त, महापुराने उध्वस्थ संसार सावरण्यासाठी धडपड - चंदगड लाईव्ह न्युज

14 November 2019

चंदगड तालुक्यातील शेतकरी मळणीत व्यस्त, महापुराने उध्वस्थ संसार सावरण्यासाठी धडपड

चंदगड तालुक्यात गेले पाच/सहा महिने पावसाने झोडपून काढल्यामुळे शिवारात अजूनही पाणी आहे.त्यामुळे सूख्या जागी भात पिकाची मळणी करताना शेतकरी वर्ग.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालूक्यातील शेतकऱ्यांची अतिवृष्टी,  पूरस्थिती व परतीच्या पावसाने संपूर्ण  शेती उद्ध्वस्त झाली . तरी पण मोठ्या  कष्टाने माळरानात पूर,अतिवृष्टी  मधून वाचलेल्या भात, भुईमूग, नाचना व रताळी आदी पिकांची सूगी करतांना शेतकरी वर्ग दिसत आहे. पावसामुळे शेतीशिवारात पाणी साचल्याने शिवारातील भात पिके रस्त्यावर किंवा सूख्या जागेत मळणी करताना तालुक्यातीलशेतकरी वर्ग दिसत आहे.
  मागील आठवड्यापर्यत सतत पडलेल्या परतीच्या  पावसाचा पिकांना  मोठा फटका बसला आहे . त्यामुळे भात , नाचणा , भुईमूग अशा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. चंदगड तालुक्यात  भात व नाचणा पिकच्या कापणीला वेग आला असून मजूरांचा तूटवडा जाणवत आहे. नातेवाईक, मित्रमंडळ किंवा पैरापध्दतीने जमवाजमव करून कामे उरकून घेतली जात आहेत . महिला  १५० रूपये  तर पुरूष मजूरांना 300 ते 400 रूपये मजुरी देऊनही मजूर वेळेवर मिळत नसल्याने कामांचा खोळंबा होत आहे.यावर्षी सलग पाच/सहा महिने पावसाने झोडपल्याने  शिवारात अजूनही पाणी वाहते  आहे . त्यामुळे भात कापणी झाली की त्या पिकाची वाहतूक करुन सुख्या जागी आणावे लागत आहे .दरवर्षी टॅक्टर सारख्या वाहनाने भात पिकाची केलेली वाहतूक यावर्षी डोकीवरून करावी लागत आहे.त्यामुळेही मजूर मिळेनासे झालेत.एकंदर यावर्षी पावसाने शेतकरी वर्गाला पिक नाही पण कष्टच कष्ट दिले आहेत. सरकारही अजून स्थापन झाले नसल्याने नुकसान भरपाई मागायची कूणाकडे या विवंचनेत शेतकरी वर्ग आहे. 

No comments:

Post a Comment