सभासदांना चादर वाटप प्रसंगी संस्थेचे माजी चेअरमन बंडू तोगले कर्मचारी व मान्यवर.
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कोवाड, ता. चंदगड येथील कोवाड मर्चंट ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोवाड या संस्थेचा रौप्य महोत्सव बुधवार दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त चेअरमन दयानंद मोटूरे, व्हाईस चेअरमन उत्तम मुळीक व संचालक मंडळाने आधी जाहीर केल्याप्रमाणे संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भेटवस्तूंचे वाटप केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसापासून संस्थेत सभासदांना भेटवस्तू स्वरूपात सोलापुरी चादर चे वाटप करण्यात आले. चादर वाटप च्या तिसऱ्या दिवशीही आपली भेटवस्तू स्वीकारण्यासाठी सभासदांनी संस्थेत गर्दी केली होती. यावेळी आलेल्या सभासदांना माजी चेअरमन व विद्यमान संचालक बंडू तोगले व कांतीलाल अंगडी यांच्या हस्ते भेटवस्तू वाटप करण्यात आले. यावेळी चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष व दैनिक पुढारीचे पत्रकार श्रीकांत पाटील, तालुका संघ संचालक राजू जाधव, मेडिकल असोसिएशनचे सदस्य रामदास बिर्जे, दशरथ बिर्जे, ऑटो मेकॅनिक शिवाजी नाईक आदी सभासदांची उपस्थिती होती.
संस्थेने गेल्या २५ वर्षात कोवाड व परिसरातील व्यापारी, नोकरवर्ग, शेतकरी, विद्यार्थी यांना व्यवसाय वृद्धीसाठी व शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ उभे करून त्यांच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलत विश्वास व जिव्हाळा संपादन केला आहे. सभासदांना यंदा 15% डिव्हीडंड व भेटवस्तूमुळे सभासदांचा संस्थेवरील विश्वास वृद्धिंगत झाला आहे.
No comments:
Post a Comment