
चंदगड पोलीस ठाणे येथे अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करताना सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग भडगावकर, उपसरपंच संजय रेडेकर प्रा. नागेश गुरव, यशवंत गुरव, प्रकाश वांद्रे, विजय कदम आदी.
नागनवाडी : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील सातवणे तसेच अन्या गावातील गणेशोत्सव काळात गणेश मूर्ती सह हलत्या देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी आठ दिवस मोठ्या प्रमाणात गर्दी होते. उत्सव काळात कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी चंदगड पोलीस ठाण्यामार्फत कडेकोट बंदोबस्त व सुरक्षा पुरवण्यात आली.
चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली पोलीस कर्मचारी व होमगार्ड टीमने सुरक्षा योजना ठेवली होती. याबद्दल सातवणे ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील व पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा चंदगडला भेट देऊन गौरव केला.
याप्रसंगी विश्वास पाटील यांनी सातवणे गाव हे देखाव्याचे गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे. येथे गणेशाचा महिमा फार मोठ्या प्रमाणात केला जातो. गावातील लोक फार उत्साही आहेत. इच्छाकांक्षी आहेत. येथील गणेश भक्तांची गर्दी पाहून आम्हाला आनंद होतो. साठवणे चे नाव महाराष्ट्राबाहेर जात आहे त्यामुळे ग्रामस्थांचा अभिमान वाटत आहे. यासाठी आम्हाला ग्रामपंचायत सरपंच सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी पोलीस पाटील तरुण कार्यकर्ते मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते यांचे आम्हाला सहकार्य लाभले असे मत व्यक्त केले.


No comments:
Post a Comment