![]() |
मारुती केदारी तेऊरवाडकर |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
किटवाड (ता. चंदगड) गावचे माजी पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते मारुती केदारी तेऊरवाडकर (वय ८५) यांचे दि. ११/९/२०२५ रोजी पहाटे निधन झाले. त्यांनी किटवाड गावचे पोलीस पाटील म्हणून तब्बल ३५ वर्षे काम पाहिले होते. गावातील अमर विकास सेवा संस्थेचे ते काही वर्षे चेअरमन होते. त्यांच्या पश्चात विवाहित २ मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर किटवाड येथे सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
ते कालकुंद्री येथील लोकनेते तुकाराम पवार ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक दयानंद तेऊरवाडकर यांचे वडील होत.
No comments:
Post a Comment