कागणी-कालकुंद्री नवीन रस्त्यावर पडलेले खड्डे
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
यंदा म्हणजे सन २०२५ च्या उन्हाळ्यात करण्यात आलेल्या कागणी ते राजगोळी खुर्द रस्त्यापैकी कागणी ते कालकुंद्री रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. या खड्ड्यांवर ठेकेदार यांनी तात्काळ उपयोजना करावी. अशी मागणी वाहनधारक, प्रवासी व ग्रामस्थांमधून होत आहे.
गेली अनेक वर्षे दुरावस्थेत असलेल्या कोवाड- बेळगाव या मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या कागणी ते कालकुंद्री, कुदनुर, तळगुळी, राजगोळी बुद्रुक, राजगोळी खुर्द ते चेन्नेटी नजीक कामेवाडी फाटा पर्यंत रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली होती. अनेक वेळा आंदोलने केल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून या रस्त्याचे काम सुरू होते. ते मार्च २०२५ मध्ये पूर्ण झाले. सात आठ महिन्यांपूर्वीच तयार झालेल्या या रस्त्यावर मात्र कागणी गावापासून पुढे कालकुंद्री कडे जाताना उताराच्या रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत. हे खड्डे दिवसेंदिवस मोठे होत चालले आहेत. तर बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या डांबरीकरणाला जाळ्या तयार झाल्याने तिथेही लवकरच खड्डे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे ठेकेदार यांनी तात्काळ लक्ष देऊन पॅचवर्क करावे अन्यथा खड्ड्यांची ही मालिका दिवसेंदिवस पुढे वाढत जाणार जाऊन पुन्हा रस्त्याची दुरावस्था व्हायला वेळ लागणार नाही. ठेकेदाराने या रस्त्याची पाहणी करून उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थ वाहनधारक प्रवासी वर्गातून होत आहे.
No comments:
Post a Comment