पक्षविरोधी कामामुळे आर. पी. आयचे चंदगड तालुकाध्यक्ष जानबा कांबळे निलंबित - चंदगड लाईव्ह न्युज

14 November 2019

पक्षविरोधी कामामुळे आर. पी. आयचे चंदगड तालुकाध्यक्ष जानबा कांबळे निलंबित


चंदगड / प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया पार्टी चे चंदगड तालुका अध्यक्ष जानबा शिवराम कांबळे (डुक्करवाडी) यांना पक्षविरोधी कारवाई करण्यात आल्ययाच्या कारणांमुळे पक्षातून निलंबित करण्यात आले असल्याचे पत्र देण्यात आले आहे. 

सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांच्या अधिपत्याखाली रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया(ऐ)च्या चंदगड तालुका अध्यक्ष म्हणून श्री. कांबळे काम करत होते. जानबा शिवराम कांबळे यांनी नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीच्या धोरणाविरोधी काम करून पक्षविरोधी कारवाई केलेली आहे. या कारणामुळे  "तुम्हाला पक्षातून सहा वर्षाकरीता निलंबित करण्यात येत आहे असे पत्र देण्यात आले आहे"  असे प.महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी चे अध्यक्ष प्रा.शहाजी कांबळे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध पत्र दिले आहे. 

No comments:

Post a Comment