कोवाड येथे आमदार राजेश पाटील यांचा रविवारी कार्यकर्त्यांच्या वतीने सपत्नीक सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

14 November 2019

कोवाड येथे आमदार राजेश पाटील यांचा रविवारी कार्यकर्त्यांच्या वतीने सपत्नीक सत्कार

आमदार राजेश पाटील                     सु्श्मिता राजेश पाटील
कोवाड / प्रतिनिधी 
चंदगड तालुक्याचे भाग्यविधाते कै. नरसिंगराव पाटील यांचे सुपुत्र राजेश नरसिंगराव पाटील यांची चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल रविवारी (ता. 17) कोवाड (ता. चंदगड) येथील हनुमान मंदिर येथे सपत्नीक किणी-कर्यात भागातील कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.
नुकत्याच झालेल्या चंदगड विधानसभा निवडणुकीमध्ये श्री. पाटील यांनी बाजी मारत चंदगड विधानसभा मतदार संघातून निवडून आले. त्याबद्दल किणी-कर्यात भागातील कार्यकर्ते व  विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आर. पी. आय. (कवाडे गट) शेतकरी कामगार पक्ष, जनता दल व मित्रपक्ष यांच्या वतीने सपत्नीक नागरी सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धेश्वर सेवा संस्था कुदनुरचे चेअरमन बाळासाहेब कोकितकर असतील तर ताम्रपर्णी पतसंस्थेचे चेअरमन सुरेशराव चव्हाण-पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होणार आहे. या सत्कार कार्यक्रमाला तालुक्यातील ग्रामपंचातीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, सेवा संस्थाचे चेअरमन, व्ही. चेअरमन व संचालक मंडळ, दुध संस्था, पतसंस्था, तरुण मंडळे, बचत गट पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन किणी-कर्यात भागातील कार्यकर्यांच्या वतीने केले आहे. 

No comments:

Post a Comment