कोवाड येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये बालदिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2019

कोवाड येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये बालदिन साजरा

कोवाड (ता. चंदगड) येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये बालदिन साजरा करण्यात आला.
कोवाड / प्रतिनिधी 
कोवाड येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये बालदिन साजरा झाला. मुख्याध्यापक श्रीकांत सुळेभावकर अध्यक्षस्थानी होते. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रतिमेचे पुजन सुळेभावकर यांच्या हस्ते झाले. रिदम कंग्राळकर या विद्यार्थ्याने नेहरुंची व भार्गव पाटील याने जवानाची वेशभूषा केली केली होती. छाया पाटील यांनी नेहरुंच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या तर सुवर्णा पाटील यांनी तंबाखू मुक्त अभियानाची माहिती दिली. यावेळी अदित्य देसाई व वेदिका उत्तुरे यांची भाषणे झाली. मुख्याध्यापक सुळेभावकर यांनी नेहरुंच्या जून्या छायाचित्रांतील प्रसंगांची माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी  फनी गेम्स घेण्यात आले. रोहिणी पुजारी यांनी सुत्रसंचालन केले. सीमा कांबळे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment