कोवाड येथील जय हनुमान दुध संस्थेच्या अध्यक्षपदी एम. एन. पाटील यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2019

कोवाड येथील जय हनुमान दुध संस्थेच्या अध्यक्षपदी एम. एन. पाटील यांची निवड

एम.एन. पाटील
कोवाड / प्रतिनिधी 
कोवाड येथील जय हनूमान सहकारी  दूध संस्थेच्या अध्यक्षपदी एम. एन. पाटील यांची निवड झाली. निवडीच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष तानाजी आडाव होते. उपाध्यक्ष रवळू बिर्जे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्षपदी निवड झालेबद्दल पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अध्यक्ष पाटील यांनी सर्वाना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे सांगून ऋतज्ञता व्यक्त केली यावेळी वैजू भोगण, धोंडीबा आडाव, रामा कुंभार, दशरथ वांद्रे,  कृष्णा नाईक, कृष्णा कांबळे, शांता  व्हन्याळकर, लीला जाधव आदी संचालक व सचिव सत्तूराम व्हन्याळकर, सागर जाधव व मारुती बिर्जे उपस्थित होते. रवळू बिर्जे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment