![]() |
विजयकुमार दळवी |
कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणाऱ्या आचार्य अत्रे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. चंदगड तालुक्यातून हा पुरस्कार दैनिक तरूण भारतचे तालुका प्रतिनिधी विजयकुमार दळवी यांना जाहीर झाला आहे . शुक्रवारी (दि. २०) रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र) रविकांत अडसूळ यांनी दिली. जिल्हा परिषद व पंचायत समितीकडील विविध योजनांचा प्रसार करण्यात पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे ठरते. वृत्तपत्रातील प्रसिध्द झालेल्या बातम्यांमुळे सकारात्मक व धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत होते. यामुळे लिखाणास प्रोत्साहन मिळावे, यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद हे पुरस्कार देत आहे. दळवी यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment