वडगाव बेळगाव येथील अजित औरवाडकर यांनी स्व.डॉ. लागूंची अशी रांगोळी काढून श्रद्धांजली वाहिली. |
कालकुंद्री / प्रतिनिधी
चित्रपट, रंगभूमीवरील नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचे नुकतेच निधन झाले. बेळगाव येथील प्रसिद्ध चित्रकार, छायाचित्रकार व रांगोळी कलाकार अजित महादेव औरवाडकर यांनी डॉ. लागूना रांगोळीतून श्रद्धांजली वाहिली. ज्योती फोटो स्टुडिओ, नाझर कॅम्प, यळ्ळूर रोड, वडगाव- बेळगाव येथे ही रांगोळी काढण्यासाठी अजित यांना आठ तास लागले. रांगोळीसाठी लेक कलर वापरले असून रंगभूमी कलाकार व कला रसिकांना दि. २१ ते २३ डिसेंबर पर्यंत सकाळी ९ ते रात्री ८.३० पर्यंत ही रांगोळी पाहण्यासाठी खुली राहील. याचा लाभ घेण्याचे अवाहन औरवाडकर कुटुंबीयांनी केले आहे.
यापुर्वीही औरवाडकर यांनी वेगवेगळे औचित्य साधून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज, सरदार वल्लभभाई पटेल, लता मंगेशकर, वि. दा. सावरकर, अटलबिहारी वाजपेयी, शहनाई वादक बिस्मिल्ला खाँ, नरेंद्र मोदी, अण्णा हजारे, अमिताभ बच्चन आदी महनीय व्यक्तींच्या साकारलेल्या विविध रांगोळ्यानाही कला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता.
No comments:
Post a Comment