चंदगड / प्रतिनिधी
बेदरकारपणे दुचाकी चालवत पुढे जात असलेल्या दुचाकीला मागुन धडक मारून दोघांना जखमी केल्या प्रकरणी आनंदा तुकाराम पाटील (रा. मरनहोळ, ता. जि. बेळगाव) यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी तीन महिन्याची शिक्षा आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत माहीती अशी - २७ मे २०१४ रोजी मरणहोळ (जि. बेळगाव) येथील सनाप्पा भैरू मोणसे हे आपल्या मुलीसोबत पॅशन प्लस मोटरसायकल (के. ए. 22, ई. डी. 9405) वरून जात होते. सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास चिंचणे ते दुंडगे मार्गावरून जात असताना दुंडगे (ता. चंदगड) गावच्या हद्दीत पोल्ट्री फार्मजवळ पाठीमागून आलेली दुचाकी (के. ए. २२ ई. एम. २५८५) वरून बेजबाबदारपणे गाडी चालवत येवून आनंद पाटील यांनी पाठीमागून धडकल्यामुळे गाडी चालक मोणसे यांच्या पाठीमागे बसलेली त्यांची मुलगीच्या पायाला दुखापत झाली होती. यामध्ये मोटारसायकलचेही नुकसान झाले होते. याबाबत मोणसे यांनी चंदगड पोलीसांत तक्रार दिली होती. त्यानुसार चंदगड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. काँ. एस. एम. रेडेकर यांनी या प्रकरणी तपास करून चंदगड येथील न्यायालयात आनंदा तुकाराम पाटील (रा. मरनहोळ, ता. जि. बेळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हयाबाबत दोषारोप पत्र दाखल केले होते. या बाबतीत चंदगड न्यायालयात न्यायाधीश श्री. बीराजदार यांच्या समोर सुनावणी झाली. यात आरोपी आनंदा पाटील याला दोषी ठरवण्यात आले. या दोषारोप प्रकरणी त्याला तीन महीने कारावासाची आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आली. या प्रकरणी सरकारी वकील सचिन भादुले यांनी मांडलेलेला युक्तिवाद आणि तपास अधिकारी पो. हे. कॉ. एस. एम. रेडेकर यांनी दिलेली साक्ष ग्राह्य माणून आनंदा पाटील यास शिक्षा सुनावली. या प्रकरणी महादेव जाधव यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.
No comments:
Post a Comment