तडशिनहाळ येथील अष्टविनायक मंडळाच्या वतीने शनिवारी रेकॉर्ड डान्स स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

18 December 2019

तडशिनहाळ येथील अष्टविनायक मंडळाच्या वतीने शनिवारी रेकॉर्ड डान्स स्पर्धा


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
श्री अष्टविनायक कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ तडशिनहाळ (ता. चंदगड) यांच्यावतीने भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. राजा शिवछत्रपती मंडप डेकोरेशन व लक्ष्मी साऊंड सिस्टीम यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी २१ डिसेंबर २०१९ रोजी रात्री ८ वाजता या स्पर्धा होणार आहेत. तरी हौशी कलाकारांनी सहभाग घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
ही स्पर्धा दोन गटात होणार असून १५ वर्षाखालील लहान गट व उर्वरीत खुला गट असणार आहे. यामध्ये प्रत्येकी तीन क्रमांक दिले जाणार आहेत. चषक व रोख रक्कम असे बक्षिसाचे स्वरूप असून खुल्या गटासाठी ७ हजारांचे प्रथम बक्षिस तर लहान गटासाठी ५ हजार प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाला दिले जाणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन वैजनाथ महादेव दरेकर यांच्या हस्ते होणार असून तडशिनहाळ गावच्या सरपंच सौ. सुजाता एकनाथ कदम या अध्यक्षस्थानी असतील. स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी आनंदा कांबळे, (9960489893), पुंडलिक दरेकर  (8975939226) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment