चंदगड नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष चार तर नगसेवकपदासाठी 59 अर्ज निवडणुक रिंगणात, अर्ज माघारीनंतरचे चित्र - चंदगड लाईव्ह न्युज

18 December 2019

चंदगड नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष चार तर नगसेवकपदासाठी 59 अर्ज निवडणुक रिंगणात, अर्ज माघारीनंतरचे चित्र


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी आठ उमेदवारांचे 8 अर्ज आले होते. अर्ज माघारीच्या दिवशी चार उमेदवारांनी माघार घेतल्याने नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज निवडणुक रिंगणात आहेत. तर नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 81 उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यापैकी आज माघारीच्या दिवशी 22 उमेदवारांनी माघार घेतल्याने नगरसेवक पदाच्या 17 जांगासाठी 59 अर्ज शिल्लक राहिले आहेत. नगराध्यक्ष व नगरसेवक असे एकूण 63 उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी निवडणुक रिंगणात आहेत. अर्ज माघारीनंतर आता प्रचाराचा धुरळा उडणार आहे. 
नगराध्यक्षपदासाठीचे रिंगणातील उमेदवार – प्राची दयानंद काणेकर, समृध्दी सुनिल काणेकर, शुभांगी उदय चौगुले, वैष्णवी आनंद हळदणकर. माघार घेतलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार – स्वरा सचिन बल्लाळ, पुनम विजय कडुकर, सुजाता सुरेश सातवणेकर, मनिषा महादेव आमणगी. 
प्रभाग क्रमांक एकमध्ये तीन, प्रभाग क्रमांक दोनमध्ये सर्वांधिक दहा, प्रभाग क्रमांक तीनमध्ये तीन, प्रभाग क्रमांक चारमध्ये दोन, प्रभाग क्रमांक पाचमध्ये सात, प्रभाग क्रमांक सहामध्ये चार, प्रभाग क्रमांक सातमध्ये दोन, प्रभाग क्रमांक आठमध्ये तीन, प्रभाग क्रमांक नऊमध्ये चार, प्रभाग क्रमांक दहामध्ये तीन, प्रभाग क्रमांक अकरामध्ये दोन, प्रभाग क्रमांक बारामध्ये तीन, प्रभाग क्रमांक तेरामध्ये दोन, प्रभाग क्रमांक चौदामध्ये तीन, प्रभाग क्रमांक पंधरामध्ये तीन, प्रभाग क्रमांक सोळामध्ये दोन व प्रभाग क्रमांक सतरामध्ये तीन असे एकूण 59 अर्ज निवडणुक रिंगणात आहेत.
चंदगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये किमी उमेदवारांनी घेतली माघार, कोण आहेत रिंगणात.

नगरसेवकांच्या 17 पदासाठी 59 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. त्यांची नावे प्रभाग क्रमांकानुसार पुढील प्रमाणे. 
1) प्रभाग क्रमांक 1 - प्रदीप लक्ष्मण कडते, अजय अशोक कदम, अभिजीत शांताराम गुरबे.
2) प्रभाग क्रमांक 2 - दिलीप महादेव चंदगडकर, राजीव दत्तात्रय चंदगडकर, चंद्रकांत पुरुषोत्तम दाणी, शंकर रामचंद्र देशमुख, जावेद लालासाहेब नाईक, खालिद मोहम्मद पटेल, जहांगीर मोहम्मद पटेल, सुधीर रामचंद्र पिळणकर, विक्रम कल्लाप्पा मुतकेकर, चेतन व्यंकटेश शेरेगार.
3) प्रभाग क्रमांक 3 - शहीदा शकील नेसरीकर, फिरदोस नियाज मदार, मुमताजबी सुलेमान मदार.
4) प्रभाग क्रमांक 4- नुरजहाँ अब्दुलरहीम नाईकवाडी, शागुप्ता तजमुल फनिबंद.
5) प्रभाग क्रमांक 5 - अब्दुलसत्तार मोहम्मदसाब नाईक, मेहताब आयुब नाईक, सिकंदर मुस्ताक नाईक, सुहेल शहाबुद्दिन नाईक, अल्लाउद्दीन महंमदगौस नाईकवाडी, इस्माईल इब्राहीम मदार, मोहम्मद शफीयुसुफ मुल्ला.
6) प्रभाग क्रमांक 6 -नविद मजिद अत्तार, झाकीरहुसेन युसुफ नाईक, अल्ताफ मोहम्मदसाहब मदार, इस्माईल मोहम्मद शहा.
7) प्रभाग क्रमांक 7-  नेत्रदीपा प्रमोद कांबळे, विध्या विश्वनाथ कांबळे.
8) प्रभाग क्रमांक 8- सचिन सदानंद पिळणकर, संतोष चंद्रकांत वनकुंद्रे, आनंद मारुती हळदणकर.
9) प्रभाग क्रमांक 9 - लक्ष्मी महादेव गायकवाड, अनुसया श्रीकृष्ण दाणी, अक्षता महेश निटूरकर, जयश्री परशराम फाटक.
10) प्रभाग क्रमांक 10 - अनिता संतोष परीट, सोनिया संजय रजपुत, सरिता संतोष हळदणकर.
11) प्रभाग क्रमांक 11 - सचिन निंगाप्पा नेसरीकर, गजानन ज्ञानोबा पिळणकर.
12) प्रभाग क्रमांक 12 - अब्दुलसत्तार अब्बास मुल्ला, फिरोज अब्दुलरशिद मुल्ला, गफार याकुब शेरखान.
13) प्रभाग क्रमांक 13- माधुरी मारुती कुंभार, सुचिता संतोष कुंभार.
14) प्रभाग क्रमांक 14 - गोविंद मनोहर गुरव, विनायक वसंत पाटील, रोहित राजेंद्र वाटंगी.
15) प्रभाग क्रमांक 15 - संजीवनी संजय चंदगडकर, सुजाता सुरेश सातवणेकर, उज्वला विश्वनाथ सुतार.
16) प्रभाग क्रमांक 16 - प्रमिला परशराम गावडे, संजीवनी संजय देसाई.
17) प्रभाग क्रमांक 17 - संजना संदीप कोकरेकर, माधुरी पांडुरंग पवार, सुवर्णा निवृत्ती गुळामकर.

No comments:

Post a Comment