'फ्लाईंग ऑफिसर' पदासाठी दामिनी देेेशमुुखची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2019

'फ्लाईंग ऑफिसर' पदासाठी दामिनी देेेशमुुखची निवड

दामिनी देशमुख
पुणे / प्रतिनिधी
पुणे येथील सहधर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख यांची कन्या दामिनी देशमुख हिची वायुदलातील 'फ्लाईंग ऑफिसर' पदासाठी निवड झाली आहे. या परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत येत, तीने दैदीप्यमान यश संपादन केले आहे.त्यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
फ्लाईंग ऑफिसर पदासाठी 'कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट' घेतली जाते. देशभरातून सुमारे दीड लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. त्यापैकी दीड-ते दोन हजार विद्यार्थी यशस्वी होतात. त्यानतर समुह चर्चा, नेतृत्व गुण, परिस्थिती हाताळणे, मैदानी खेळ, अशी व्यक्तीमत चाचणी घेतली जाते. वैद्यकीय चाचणी देखील घेतली जाते. 'एअरफोर्स सलेक्शन बोर्डा'कडून मुलाखत घेतली जाते. त्यातून अंतिम निवड केली जाते. यासर्व अवघड प्रक्रिया पार पाडून दामिनी देशमुख हिने हे यश संपादन केले आहे. या परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत येण्याचे प्रमान तीन ते चार टक्केच असते. दामिनी देशमुखचे पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत झाले आहे. त्यानंतर तीने बी. ई. मेकॅनिकची पदवी प्रथम ऋेणीत उत्तीर्ण केली आहे. हैद्राबाद येथील एअरफोर्स अ‍ॅकॅडमीमध्ये एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर ती फ्लाईंग ऑफिसर म्हणून रूजू होणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हैद्राबाद येथील  प्रशिक्षणासाठी ती रवाना होईल. दामिनी देशमुख ही ज्येष्ट पत्रकार एस. एम. देशमुख यांची पुतणी आहे.

No comments:

Post a Comment