चंदगड / प्रतिनिधी
चंदगड नगरपंचातीसाठी आज अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी 4 व्यक्तींनी पाच अर्ज दाखल केले आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज अद्याप आला नाही. बुधवारी व गुरुवीर या अर्ज भरण्याच्या दोन दिवसात एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहीती निवडणुक निर्णय अधिकारी संपत खिलारी यांनी सांगितले.
आज दिवसभरात प्रभाग 5, 7 व 16 यामध्ये प्रत्येकी एका उमेदवारने एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर प्रभाग क्रमांक सहामध्ये एका उमेदवाराने 2 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज दिवसभरात मेहताब आयुब नाईक यांनी नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक पाच म्हणून उमेदवार अर्ज दाखल केला आहे. झाकीर हुसेन युसुफ नाईक प्रभाग क्रमांक सहा मधून दोन अर्ज दाखल केले आहे. नेत्रदिपा प्रमोद कांबळे यांनी प्रभाग क्रमांक सात एक अर्ज दाखल केला आहे तर संजीवनी संजय देसाई यांनी प्रभाग क्रमांक सोळा मधून अर्ज दाखल दाखल केला आहे. असे आज दिवसभरात चार व्यक्तींचे पाच अर्ज दाखल झाले आहेत. चार डिसेंबरपासून अर्ज भरण्याला सुरवात झाली असली आहे. अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरुन निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करावे लागत असल्याने या प्रक्रीयेला वेळ लागत आहे. त्याचबरोबर कागदपत्राची जुळवाजुळव करण्यात अनेक उमेदवार गुंतले आहे. चंदगड नगरपंचायतीसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, स्वाभीमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष हे पक्ष सद्यातरी स्वतंत्र निवडणुक लढविणार असल्याने याबाबत बैठकांना जोर आला आहे. सर्वच पक्ष संपुर्ण पॅनेल उभे करण्याच्या तयारीत आहेत. सर्वच पक्ष स्वतंत्र लढल्यास निवडणुकीतील चुरस वाढणार आहे.
No comments:
Post a Comment