![]() |
प्रा. रमेश चव्हाण |
उत्तूर (ता. आजरा) येथील त्रिवेणी सांस्कृतिक शैक्षणिक व क्रीडा संस्था उत्तर यांच्या वतीने दरवर्षी त्रिवेणी आदर्श पत्रकार पुरस्कार दिला जातो. यावर्षी सन 2020 सालचा पुरस्कार महाराष्ट्र टाइम्सचे आजरा प्रतिनिधी प्रा. रमेश चव्हाण यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
गेली अनेक वर्ष महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून परिसराचे व सामान्य माणसाच्या जगण्या, मारण्याच्या समस्यांना वाचा फोडून सरकार दरबारी न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्याच प्रमाणे साहित्य संगीत व कला यांच्या चळवळींनाही त्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. ते एक उत्तम कलाकार व गायक आहेत. इंग्रजीवर प्रभुत्व असलेले आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. अभिनय, गायन यांची उत्तम जाण असून महाविद्यालयीन सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना कलेच्या प्रांतात करियर करण्यास उद्युक्त केले आहे. अशा एका अष्टपैलू पत्रकाराला संस्थेच्या वतीने पुरस्कार जाहीर केल्याची माहीती संस्थेचे प्रा. श्रीकांत नाईक, महेश करंबळी, सुहास पाटील, देशभुषण देशमाने, शैलेद्र आमणगी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
No comments:
Post a Comment