किणी येथे कोवाड केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2019

किणी येथे कोवाड केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धा उद्घाटन करताना मधुमती गावस, सोबत केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, पी जे मोहनकर, प्रेमीला बामणे आदी मान्यवर.
कोवाड / प्रतिनिधी
कोवाड (ता.चंदगड) केंद्रांतर्गत किणी येथे झालेल्या अध्यक्ष चषक वार्षिक क्रीडा स्पर्धेत कनिष्ठ गटात दुंडगे शाळेने कबड्डी मुले मुली व खो खो मुले विभागाचे विजेतेपद पटकावले तर वरिष्ठ गटात तेऊरवाडी शाळेने मुले मुली कबड्डी, खो-खो व मुलांच्या रिले विभागात विजेतेपद पटकावले. वरिष्ठ गटात मुलींच्या रिलेत मलतवाडी शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.वरिष्ठ गट इयत्ता सहा ते आठ चे विजेतेपद विमं तेऊरवाडी, कनिष्ठ गट इयत्ता पहिली ते पाचवी चे विजेतेपद विमं दुंडगे शाळेने तर दोन्ही गटांचे उप विजेतेपद विमं. मलतवाडी शाळेने पटकावले. स्पर्धेचे उद्घाटन केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत व्ही. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोवाड शाळेतील अध्यापिका व कर्नाटक राज्य खो-खो संघाच्या माजी कर्णधार मधुमती गावस यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून किडा मार्गदर्शक पी जे मोहनगेकर, अल्पी लोबो, विठ्ठल नांदुरकर आदी उपस्थित होते. स्वागत मुख्याध्यापक ए के पाटील यांनी तर प्रास्ताविक विलास पाटील यांनी केले. आभार मंगल पाटील यांनी मानले. यावेळी सुधीर सुधिर मुतकेकर, प्रेमिला बामणे, संकपाळ केंद्रातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.स्पर्धा पार पाडणे कामी जयप्रकाश विद्यालय किणी,विद्यामंदिर किणी व दुंडगे शाळांचे विशेष योगदान लाभले.

No comments:

Post a Comment