डुक्करवाडी विद्यालय येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृतिदिन संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2019

डुक्करवाडी विद्यालय येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृतिदिन संपन्न

डुक्करवाडी (ता. चंदगड) येथील विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिदिन संपन्न.
मागणाव / प्रतिनिधी 
चंदगड  तालुक्यातील बागीलगे-डुक्‍करवाडी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एम कांबळे सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर प्राध्यापिका वंदना कालकुंद्रीकर मॅडम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा आढावा यावेळी कथन केला .यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment